करमाळा

माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या निधीतून 25 हाय मास्टर दिवे मंजूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या पाठपुराव्याला यश

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील शहर ग्रामीण भागात 25 ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हाय मस्त दिवे मंजूर झाले आहेत.माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामांना मंजुरी दिली होती.याशिवाय खासदार निंबाळकर यांनी करमाळा शहरातील श्रीकृष्ण हॉस्पिटल शेजारी नाला ट्रेकिंग साठी 70 लाख रुपये मंजूर केले आहेत.शिवाय करमाळा शहरातील विविध विकास कामासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत त्याचे निवेदन निघून टेंडर प्रक्रिया सुरू आहे.                       याबाबत बोलताना महेश चिवटे म्हणाले की.          माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा व शहर व तालुक्यातून आपल्या खासदार निधी सोडून महाराष्ट्र शासनाकडून जवळपास वीस कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतली असून ती कामी आता तालुक्यात सुरू झाली आहेत.या सर्व कामाच्या उद्घाटनासाठी माजी खासदार यांची नाईक निंबाळकर भूमिपूजनासाठी येणार असूनत्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या सर्व पदाधिकारी अधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे.रणजीत सिंह नाईक निंबाळकर लोकसभेला पराभूत झाले असले तरी दर महिन्याला ते करमाळा दौऱ्यावर येणार असून जनता दरबार घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group