करमाळा

जुनी पेन्शन विकल्पाबाबत स्पष्टता यावी जुनी पेन्शन संघटनेची मागणी वित्त विभागाप्रमाणे अन्य विभागांनी शासन निर्णय काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर यांना लेखी निवेदन देण्यात आले, अशी माहिती जिल्हानेते तात्यासाहेब जाधव यांनी दिली.
दि. 2/2/2024 रोजी वित्त विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात पण प्रत्यक्षात नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर देण्यात आली अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन स्विकारण्याची संधी दिली आहे. या शासन निर्णयात सहा महिन्यांत विकल्प देण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. शासन निर्णयात कोणत्याही प्रकारचा विहित नमुना यासाठी दिलेला नाही. शिवाय आजवर वित्त विभागाने एनपीएस संदर्भात जे जे शासन निर्णय काढले त्यात इतर विभागांनी आपापले शासन निर्णय काढावे अशा सूचना असायच्या यावेळी तशी कोणतीही सूचना नाही त्यामुळे याबाबत आपल्या स्तरावरून यासंदर्भात मार्गदर्शन मागविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. आदरणीय मॅडमनी यावेळी सांगितले की मी स्वतः लाभार्थी असून याबाबत मी स्वतः लक्ष घालून याविषयी मार्गदर्शन घेईन आणि आपल्या संघटनेशी तसा पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांनी दिली.
जाहिराती बरोबरच याच काळात अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात आलेले कर्मचारी, असे अंशकालीन कर्मचारी जे 1 नोव्हेंबर 2005 नंतर कायम झाले अशा कर्मचाऱ्यांबाबत या शासन निर्णयात कोणतीच स्पष्टता नाही. याविषयीही मार्गदर्शन मागविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील जाहिरात मुद्द्याशी निगडीत बंधू भगिनींना विनंती आहे की आपण कोणीही पॅनीक होऊ नये. लवकरात लवकर याबाबत कार्यवाही सुरू होईल. ग्रामविकास व शिक्षण विभागाचे शासन निर्णय येणे आवश्यक असून राज्य कार्यकारिणी याविषयी मंत्रालयात पाठपुरावा करत आहे. आपण कोणतीही कागदपत्रे, याद्या जमा करण्याची गरज नाही हे काम प्रशासनाचे आहे. आपण फक्त आपला मूळ आदेश उपलब्ध करून द्यायचा आहे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस किरण काळे यांनी केले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री अरूण चौगुले, साईनाथ देवकर, सतिश चिंदे, प्रताप राऊत, विनोद वारे, अजित कणसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group