करमाळा

समरसता साहित्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर लेखन स्पर्धा-प्रा.माधव कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी 
समरसता साहित्य परिषद महाराष्ट्रच्यावतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय खुल्या लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समरसता साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, महिला आयाम प्रमुख वसुंधरा शर्मा-कुलकर्णी यांनी दिली.
अहिल्यादेवी : न्यायप्रिय आदर्श प्रशासक व समाज सुधारक, अहिल्यादेवींचे धर्मकार्य व राष्ट्रीय दृष्टिकोन, अहिल्यादेवी होळकर भारतीय स्त्री चिंतनाच्या आदर्श, अहिल्यादेवींचे जीवन कार्य, आजच्या युगातील प्रासंगिकता, अहिल्यादेवी व पारंपरिक स्थापत्य आणि कलाविकास असे विषय या स्पर्धेसाठी आहेत. या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार एक रुपये, द्वितीय पारितोषिक सात हजार एक रुपये, तृतीय पारितोषिक पाच हजार एक रुपये, उत्तेजनार्थ तीन हजार एक रुपये तसेच जिल्हास्तरावर विशेष बक्षिसे आहेत. या लेखासाठी 800 ते 1000 शब्दांची मर्यादा आहे. कोणत्याही एका विषयावर लेख पूर्ण टाइप करून किंवा सुंदर हस्ताक्षरात लिहावा. त्यावर स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि जिल्हा लिहून ीरारीरीरींरारहसारळश्र.लेा या ई-मेलवर 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 पर्यंत पाठवावा. ई-मेल वर लेख पाठवताना विषयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी खुली लेखन स्पर्धा असा उल्लेख करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!