पोथरे येथील आनंदी मंगल कार्यालय येथे सामुदायक व्रत्तबंध सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
करमाळा प्रतिनिधी पोथरे येथे सामुदायिक व्रतबंध संस्कार संपन्न. ब्राह्मण महासंघ देवीचा माळ यांचेवतीने घेण्यात आलेल्या सामुदायिक संस्कार सोहळ्यात 17 बटुवर संस्कार करण्यात आल्याची माहिती आयोजक समितीच्या वतीने बाळासाहेब होसिंग यांनी दिली. संस्कार सोहळ्याचे पौरोहित्य बीड येथील मिथुन निर्मळ गुरूजी यांनी केले असुन बटुना आशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा संस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सूर्यपुजारी संतोष काका कुलकर्णी (राजुरीकर) श्रीनिवास पुराणिक सुशील पुराणिक सागर पुराणिक सारंग पुराणिक अभय पुराणिक श्रीनिवास पुराणिक रविराज पुराणिक सौरभ शास्त्री निलेश गंधे शैलेश गंधे पद्माकर सूर्यपुजारी बालाजी देशमुख प्रविण गंधे अतुल देशपांडे राजु पुंडे शुभम पुराणिक अभिमन्यू गंधे अंकुश गंधे अभिजीत गंधे शुभम गंधे रविन्द्र विद्वत या ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास श्रीगोंदा कर्जत परंडा अहमदनगर कडा आष्टी बीड पुणे सोलापूर सातारा येथून ब्रह्मवृंद बांधव आले होते
*************††**
: मुंज/उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार आहे. हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत.
बाळासाहेब होसिंग,
करमाळा
