विविध कार्यकारी सोसायटी मांगीच्या चेअरमनपदी सुजित बागल व्हाईस चेअरमनपदी अभिमान अवचर यांची निवड
करमाळा- प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे लक्ष वेधून असलेल्या मांगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे गटाने एकहाती विजय मिळविला होता. या निवडणुकीत 13 पैकी तब्बल 11 जागी सुजित बागल यांचे नेतृत्वाखाली, आमदार शिंदे गटाचे सदस्य निवडून आलेले होते. सदर संचालकांमधून आज चेअरमन निवड सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा या ठिकाणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ मुंडे मॅडम यांनी काम पाहिले. मांगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सुजित बागल व व्हाईस चेअरमन पदासाठी अभिमान आबा अवचर यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे, दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
माजी आमदार बागल व माजी आमदार पाटील यांचे विरोधात सुजित बागल यांनी आमदार संजयमामा शिंदे गट उभा केलेला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत आमदार शिंदे गटाने विरोधी गटाला धोबीपछाड करून 11 संचालक निवडून आणले.
आजच्या या निवड प्रसंगी नामदेव बागल, दिलीप बागल, विठ्ठल बागल, दिवाण बागल, अभिमन्यू अवचर ,नंदकुमार नरसाळे, नानासो नलवडे, संभाजी बागल, सुजित बागल, प्राची संभाजी नलवडे, अश्विनी सुजित बागल ,मंगल रमेश खरात हे संचालक उपस्थित होते.
