करमाळा तालुक्यासाठी आनंदाची बातमी उजनी धरण आले प्लसमध्ये
करमाळा प्रतिनिधी पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज प्लसमध्ये आले आहे. काल रात्री 9 वाजता उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा 63.25 टीएमसी इतका आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे .उजनी धरणात जवळपास दहा टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनी हे प्लसमध्ये आलं आहे. मागच्या वर्षी हे धरण 22 जुलै रोजी प्लसमध्ये आलं होतं. यंदाच्या वर्षी चार दिवसांनी म्हणजे 26 जुलै रोजी प्लसमध्ये आलं आहे. धरणाची क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे. सध्या उजनी धरणात १०.६७टक्के जिवंत पाणी साठा आहे.
