Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

घारगावच्या सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांचे कडून जिल्हा परिषद शाळेला शंभर पुस्तके भेट

*घारगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ निमित्त
आज इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आणि मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी घारगावच्या सरपंच यांनी स्त्री शिक्षणाविषयी आणि संतांविषयी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला श्री संत संताजी महाराज यांचे जीवन चरित्र पर शंभर पुस्तके शाळेला भेट देण्यात आली त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी घारगावचे विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी सरवदे माजी सरपंच लोचना काकू पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष केसकर सदस्य काशिनाथ भोगले, माजी अध्यक्ष राजेंद्र पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!