आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!” कंदर येथे आज आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन
करमाळा प्रतिनिधी
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन आज मौजे कंदर येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी भास्कर भांगे, अमोल भांगे, आबासाहेब साळुंखे, सुहास रोकडे, उमेश इंगळे ,सुजित बागल, वैभव तळे ,तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्यासह आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग ,पंचायत समिती विभाग, महसूल विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड , रेशनकार्ड वरील नाव कमी करण्याचा दाखला, प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना पूर्व संमतीपत्र, रोजगार हमी योजना जॉबकार्ड आदींचे वाटप आमदार संजयमामा शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कंदर येथील शिबिरांमध्ये आज नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
चौकट…
नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा –
आ. संजयमामा शिंदेचे आवाहन
करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण हा उपक्रम राबवत असून यापूर्वी रावगाव, चिखलठाण ,जातेगाव ,साडे ,कोर्टी, केतुर नंबर 1 आदी गावांमध्ये हा उपक्रम राबविला असून याचा लाभ जवळपास 12 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी घेतलेला आहे. अधिकाधिक नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आपले प्रश्न सोडवावेत असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी यावेळी केले.
