१५ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन- संजय सरवदे
पुणे प्रतिनिधी
पुणे या ठिकाणी धनगर समाज सेवा संघा तर्फे १५ व्या राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे असे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष व संस्थापक श्री मुकुंदराव कुचेकर यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे मागच्या दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भाव काळामुळे सदर वधू वर मेळावा ऑनलाईन व अत्यंत साध्या पद्धतीने घेण्यात आला होता परंतु यावर्षी मात्र हा वधू वर मेळावा भव्य व दिव्य स्वरूपात घेण्यात येणार आहे धनगर समाजातील सर्व पोट जातीमधील धनगर समाज बांधवांनी आपल्या इच्छुक वधू-वरांची नावे १० डिसेंबर २०२२ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी नावे नोंदणी सुरू करण्यात आली आहे आपल्या शिक्षित मुला मुलींना वधू वर निवडीसाठी एकमेव मेळावा म्हणजे धनगर समाज सेवा संघाचा असल्याचे पुणे शहर कार्यकारणी सदस्य श्री संजय सरवदे यांनी केली आहे.
