*मंगेश बदर हा आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो- विलासराव घुमरे सर
करमाळा प्रतिनिधी
कान्समध्ये मंगेश बदर दिग्दर्शित मदार या चित्रपटाची निवड झाल्याप्रीत्यर्थ साप्ताहिक पवनपुत्रच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील संस्थाचालक व प्राध्यापकवर्गाशी संवाद साधला असता….
महाराष्ट्र शासनाने कान्स या मे २०२३ मध्ये फ्रान्स येथे संपन्न होणाऱ्या आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी मंगेश महादेव बदर दिग्दर्शित मदार या चित्रपटाची निवड केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो कारण मंगेश बदर हा करमाळा तालुक्यातील घोटी या गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा असून त्याने आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले व आज तो मदार या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध होत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे त्याच्या फ्रान्स दौर्यास संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असे गौरवपूर्ण उद्गार विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी काढले.
विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, सहसचिव विक्रम सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे,उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनीही मंगेश बदर याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल्. बी. पाटील यांनी मंगेश बदर याने चित्रपट क्षेत्रात यश व कीर्ती संपादन करून महाविद्यालयाचे नाव रोशन करावे या गौरवपूर्ण शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी विभागप्रमुख प्रा. प्रदीप मोहिते म्हणाले की, मंगेश आमच्या मराठी विभागाचा विद्यार्थी आहे याचा मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. प्रा.नितीन तळपाडे आणि प्रा. प्रमोद शेटे यांनीही मंगेश बदरचे कौतुक करताना त्याला उतरोत्तर यश मिळावे या साठी शुभेच्छा दिल्या.*
