भगवंताचे नामस्मरण करणे ही भक्ताची ताकद असून ,देवाचे स्मरण करुन नुकसान होणाऱ्या गोष्टी पासून दूर रहा केत्तूर येथे हरिनाम सप्ताहाची सांगता
केत्तूर ( अभय माने) भगवंताचे नामस्मरण करणे ही भक्ताची ताकद असून ,देवाचे स्मरण नामस्मरण करत रहा चिंतन करत रहा. आपले ज्या गोष्टीपासून नुकसान होणार आहे अशा गोष्टीपासून मात्र दूर राहा असे उद्गगार हभप उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी) यांनी केत्तूर ( ता. करमाळा )येथील हरिनाम सप्ताह सप्ताहामध्ये काल्याचे कीर्तनात केले .श्रावण महिन्यात केत्तुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची सांगता उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे काल्याचे किर्तनाने झाली.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाची वाटप करण्यात आले.
अखंड हरिनाम सप्ताह काळात पांडुरंग महाराज सातपुते (भिगवन ) ,लक्ष्मण महाराज झेंडे (खातगाव ),शांतीलाल महाराज जंजीरे ( पिंपळवाडी), उमेश महाराज बागडे (आळंदी ), अनिल महाराज महाकले (आळंदी ), माऊली महाराज झोळ (वाशिंबे), दिगंबर महाराज पवार (पोफळज ) यांची कीर्तन सेवा झाली.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे व्यासपीठ चालक म्हणून योगेश महाराज घाडगे (आळंदी) व दत्तात्रय महाराज सुपेकर ( दिवेगव्हाण) यांनी काम पाहिले.सप्ताहाचे आयोजन क्रांतीसिंह पाटील यांनी केले होते.
मृदंगसाथ मध्ये मृदंगाचार्य महेश महाराज येवले यांची साथ होती.
