माणुसकीचा धर्म पाळुन वैद्यकीय सेवा करणारे डाॅ महेशचंद्र वीर – प्राचार्य मिलिंद फंड
करमाळा प्रतिनिधी जीवनात पैशापेक्षा माणुसकी हाच खरा धर्म मानुन रुग्ण सेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन निरपेक्ष भावनेने काम करणारे डाॅ.महेशचंद्र वीर यांचे कार्य कौतुकास्पद आहे.असे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड यांनी व्यक्त केले. डाॅ महेशचंद्र वीर यांच्या वाढदिवसानिम्मित मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले आजच्या युगामध्ये माणुस पैशाच्या मागे लागला असुन प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा लागली आहे अशा परिस्थितीत समाजकार्याचा वसा जपत गोरगरिब व जनसामान्यांची माफक दरात सेवा करण्याचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये सुरताल संगित विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे नगरसेवक महादेव फंड अतुल फंड, कुणबी मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, अर्बन बॅकेचे मॅनेजर विनायक चिवटे. प्रा.कृष्णा कांबळे निलेश जोशी अतुल चव्हाण सर आशपाक सय्यद सुनील सावरे संतोष पोतदार गुरुजी अजिंक्य पाटील, शिवकुमार चिवटे भोजराज फंड,महेश गवळी,लक्ष्मण लष्करगुरुजी,संतोष जगताप अशोक बरडे गुरुजी सुहास कांबळेगुरूजी,अमोल कांबळे,वैभव वीर,राजाभाऊ मस्कर ,लोकरे गुरूजी सुरज वनारसे,निंबाळकर मेडिकलचे मालक सोमनाथ निंबाळकर,प्रेमाचा चहाचे मालक जयदिप आदी मान्यवर मित्रांच्या उपस्थितीमध्ये सत्काराचा कार्यक्रम संप्पनं झाला.
