दत्त मंदीर ते कोर्ट मुख्य रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्याची मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मुख्य सरकारी ऑफीस काॅलेज कोर्ट येथील जाणारा दत्त मंदिर ते विश्रामगृह हा मुख्य रस्ता असुन त्याची अवस्था खराब झालेली दिसुन येत आहे तरी त्याची ताबडतोब दुरूस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संजय (बापु)घोलप यांनी जि.प.करमाळा यांच्या कडे मागणी केली
सदरील रस्ता दुरूस्ती होण्याची अवश्यता असुन सर्व पुणे कडे जाणारी जड वाहने येथुनच जातात तरी रस्त्यावर दुरूस्ती न झाल्यास घात पात होण्याची जास्त शक्यता आहे कारण कि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय चे विध्यार्थी, सर्व सरकारी कर्मचारी,कोर्ट यांची वरदळ जास्त असल्यामुळे व घातपात घडु नये म्हणून रस्ता दुरूस्ती अती म्हणून म्हत्वाची आहे अशी मागणी विध्यार्थी कडुन पण होत आहे हा रस्ता जि.प .बांधकाम विभाग करमाळा यांच्या हद्दीत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून तक्रारी अर्ज करून देखील रस्ता दुरूस्त होत नाही
जर हा रस्ता 15 दिवसांत दुरूस्त झाला नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने अंदोलन करून रस्तावर खड्डे खांदुन विध्यार्थीकडुन वृक्षारोपण करू असा ईशारा मनसे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी दिला आहे…
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे, ता.उपाध्यक्ष राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष सतिश फंड, जि.उपाध्यक्ष म.न.वि.से आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष अजिंक्य कांबळे, शहर उपाध्यक्ष सचिन कणसे, किरण कांबळे, आबासाहेब जगताप (वाहतुक सेना तालुकाध्यक्ष) सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख महेश डोके योगेश काळे, म.न.वि.से शहउपाध्यक्ष अमोल जांभळे, मनसे सोशलमेडीया स्वप्निल कवडे, शहउपाध्यक्ष म.न.वि.से सुशिल नरूटे उपस्थित होते.
