मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!इंदापूरचे भूषण सुर्वे यांच्याकडे महाराष्ट्र सोशल मीडियाची जबाबदारी
पुणे (भिगवण) | पक्ष विरहित समाजकार्य आणि रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्याप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख तथा CM कार्यअधिकारी, गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर, वैद्यकीय कक्षाचे नवनिर्वाचित कक्ष प्रमुख मा. रामहरी राऊत, सह-कक्ष प्रमुख माउली धुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र समन्वयक युवराज काकडे जितेंद्र सातव यांच्या हस्ते पुण्यामध्ये इंदापूर-बारामती-दौंड-भिगवण या भागातील आरोग्यसेवेत काम करणाऱ्या युवकांच्या तसेच पुणे शहरातील युवकांच्या नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.
महाराष्ट्रभर आत्तापर्यंत 27 जिल्ह्यात 5000 पेक्षा जास्त पदाधिकारी कार्यरत असून 15000 विविध दुर्मिळ शस्त्रक्रिया आणि 3000 लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्राच्या शास्त्रकिया मोफत करून दिल्या आहेत आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम आता इंदापूर-बारामती-दौंड-भिगवण या ग्रामीण भागात मोठ्या जोमाने आणि जोशाने करण्यासाठी या युवकांनी करण्याचे ठरविले आहे यासाठी वैद्यकीय कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता कक्ष कोठेही कमी पडणार नाही असे यावेळी रामहरी राऊत, माउली धुळगंडे व मंगेश चिवटे सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले. इंदापूर तालुक्यात बंद पडलेल्या सरकारी योजना लवकरच चालू करून देण्याचेही यावेळी मंगेश चिवटे यांनी बोलताना सांगितले तसेच तरुण युवकांनी आरोग्याच्या क्षेत्रात उतरून मदत करण्याचेही यावेळी चिवटे यांनी सांगितले.
यावेळी मंगेश चिवटे यांच्या विश्वासास पात्र ठरलेले इंदापूर तालुक्यातील व मावळते पुणे उपजिल्हा समन्वयक मा शिवश्री भूषण सुर्वे यांना बढती म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया प्रमुख हि जबाबदारी यावेळी देऊन मा युवराज काकडे आणि जितेंद्र सातव यांच्या हस्ते नियुततीपत्रक देण्यात आले. तसेच पुणे उपजिल्हा समन्वयक म्हणून भिगवणचे मा. विशाल धुमाळ, इंदापूर-बारामती-दौंड वैद्यकीय सहाय्यक म्हणून सागर बनसोडे, इंदापूर शहर वैद्यकीय समन्वयक म्हणून सागर आवटे, वैद्यकीय सहाय्यक adv आनंद केकाण व सोमनाथ लांडगे, भिगवण शहर समन्वयक सुरज पुजारी, भिगवण शहर वैद्यकीय सहाय्यक राहुल ढवळे, पुणे उपशहर वैद्यकीय सहायक राहुल भोसले, पुणे विभागातील वैद्यकीय सहायक विजय ढोणे, वसीम अत्तार, सुरज ढोबळे, संतोष खरात आणि गणेश लांडे या सर्वांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, या कार्यक्रमास महाराष्ट्र समन्वयक युवराज काकडे, समन्वयक जितेंद्र सातव, adv गणेश शिरसाट, adv कानिफ कानतोडे धाराशिव जिल्हा समन्वयक, ऋषिकेश देशमुख, सुरज जम्मा यावेळी उपस्थित होते.
