Saturday, September 19, 2026
Latest:
आध्यात्मिककरमाळा

वाशिंबे येथे भैरवनाथ सातकी मोठ्या उत्साहात साजरी.

*वाशिंबे प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जागृत देवस्थान वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिर आहे. सालाबादप्रमाणे येथे भैरवनाथ सातकी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर प्रदक्षिणा फेरी करून गायनाचार्य ह.भ.प.माऊली महाराज झोळ यांचे सुस्रवे असे किर्तन झाले.व यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळ उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात महाप्रसाद /भोजन पंगती झाल्या.या कार्यक्रमचे नियोजन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट समिती व समस्त ग्रामस्थ, गावातील तरुण मंडळी यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!