Friday, April 25, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

तपश्री प्रतिष्ठान बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र मोतीबिंदू तपासणी शिबिरात ४० रुग्णांची नेत्र तपासणी 22 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना

  करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान,गोसेवा समिती दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे संयुक्तविद्यमानाने दिनांक 27-12-2023 वार – बुधवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध डॉ. महेंद्र नगरे,तसेच डॉ. महेश वीर , गो सेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी,मा. नगरसेवक नारायण तात्या पवार,नितीन दोशी,दिनेश मुथा, वैभव दोशी,आशिष बोरा,जमील काझी, विनोद पडवळे यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत सुमारे 4750 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.आजच्या शिबिरात 40 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 22 रुग्ण ऑपरेशन साठी पुणे येथे रवाना झाले .प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था, नगर रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉ. नगरे यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. जमीलभाई काझी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.जगदीश जी शिगची यांनी आज पर्यंत तपश्री ग्रुप ने रामकथा, भागवत कथा, शिवमहापुरण, गाईचे संगोपन, धार्मिक यात्रा, असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात अशी माहिती दिली. तसेच खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरासाठी अमोल महाराज काळदाते,संतोष भांड ,गुलाम गोस ,चंद्रकांत काळदाते , विजय बरीदे ,गिरीश शाह,पोपट राव काळदाते,शशि अप्पा ननवरे,यांच्या सह अनेकांनी
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले… कार्यक्रमाचे सूत्र संचालन संकेत खाटेर यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group