करमाळा तालुका शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी येत्या दोन वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू करणार -प्रा . रामदास झोळसर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात व्यावसायिक शिक्षण काळाची गरज असून शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी करमाळा शहरामध्ये येत्या दोन वर्षांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू करणार असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी व्यक्त केले. दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूल केत्तुर नं 1 येथील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ मॅडम, उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, प्रा.रामदास झोळ सरांचे वडील मधुकर काका झोळ, दत्तकला शिक्षण संस्थेचे खजिनदार झोळ सरांचे बंधु अनुरथ दादा झोळ, राजेश्वर शैक्षणिक संस्थेचे संस्थापक सरांचे सासरे लालासाहेब जगताप सर, सुधीर खाटमोडे,संभाजी खाटमोडे, एकनाथ शिंदे,राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले.आबासाहेब टापरे,श्रीकांत साखरे,गणेश जाधव, वाशिबेंचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या . या क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अविष्कार 2023 या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कला नृत्याच्या माध्यमातून आपली कला नृत्याच्या माध्यमातून सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. केत्तुर सारख्या ग्रामीण भागातही दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट शिक्षणाचे झालं सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे मुंबईच्या धर्तीवर चांगले शिक्षण मिळत आहे. प्राचार्य विजय मारकड सर व त्यांची टीम चांगली काम करत असून दत्तकला शिक्षण संस्थेने करमाळा तालुक्यात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे त्यामुळे करमाळा तालुक्यात शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय सुरू करून करमाळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा मानस असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य विजय मारकड सर व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते. दत्तकला आयडियल इंग्लिश स्कूल स्नेहसंमेलन संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात आनंदात संपन्न झाला.
