मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्यामुळेच आदिनाथचे गळीत हंगामाचा शुंभारंभ रश्मीदिदी बागल यांनी केली कार्यस्थळाची पाहणी
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या तावडीतून काढून सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची महत्त्वाची भूमिका ठरली आदिनाथ कारखान्याचा मुळी टाकण्याचा होणारा कार्यक्रम हा करमाळा तालुक्याच्या इतिहासातला परिवर्तन करणारा दिवस आहे तरी या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी कामगार कष्टकरी मजूर शेतकरी मजूर व सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपण सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत हे दाखवून देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बागल गटाच्या नेत्या आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालिका सौ.रश्मी दिदी बागल यांनी केले आहे.मोळी कार्यक्रमास दि 25/12/2022 रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार असुन त्या कार्यक्रम ठिकाणची पुर्व पहाणी व नियोजन करताना सौ रश्मीदीदी बागल यांनी केली यावेळी चेअरमन, धनंजय दादा डोंगरे, संचालक नानासाहेब लोकरे, पांडुरंग जाधव,दिलीप केकान,लक्ष्मण गोडगे,प्रकाश पाटील अर्जुन भोगे,राजेंद्र पवार संचालक मंडळ व पोलीस प्रशासन,पदाधिकारी वर्ग उपस्थित होते..
