घारगाव येथे महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या सुचने नुसार स्वच्छता अभियान संपन्न
घारगाव प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या सूचनेनुसार स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामस्थांकडून ,”स्वच्छता हीच देशसेवा” उपांतर्गत “एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला . शाळा, अंगणवाडी, एसटी स्टँड, सार्वजनिक जागा, तसेच ग्रामपंचायत समोरील सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता करण्यात आली यावेळी घारगावच्या विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे ,उपसरपंच सतीश बापू पवार, माजी सरपंच लोचना काकू पाटील. माजी सरपंच अनिता भोसले ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे , सुरेंद्र होगले हनुमंत होगले ,मा. सदस्य लक्ष्मण पवार, सुनील होगले, ग्रामसेवक रवींद्र काळे, ग्रामपंचायत कर्मचारी मुकेश मस्तुद, अंगणवाडी सेविका , गावातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
