श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांच्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्त कमलादेवी मंदिरात स्वच्छता अभियान संपन्न
करमाळा प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) गुरूपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक चे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊलीं व गुरूपुत्र युवासंत आदरणीय दादासाहेब यांच्या शुभ आशिर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तेली गल्ली, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोसे येथील महिला सेविकऱ्यांनी श्री कमलाभवानी मातेच्या मंदिरात आज एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमात सहभाग नोंदविला…. आज एकाच वेळी गांधी जयंती निमित्त एक तास स्वच्छतेसाठी या केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या सेवेमध्ये दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी न्हावकर काका व काकू ,कदम साहेब व कदम ताई, सुपेकर ताई, जगताप ताई, राऊत ताई, माने ताई, रोडगे ताई, बरूटे ताई ,जगदाळे ताई आणि इतर सेवेकरी या सेवेमध्ये सहभागी झाले होते. कमलादेवी मंदिरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केल्याबद्दल स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
