करमाळा विधानसभा मतदारसंघात चौघांमध्ये होणार काटे की टक्कर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता काटे की टक्कर पाहायला मिळणार असून तब्बल उमेदवार रिंगणात उभे राहिले असले तरी प्रत्यक्षात चौरंगी लढत होणार असल्याची चित्र स्पष्ट झालेले आहे आज उमेदवारी अर्ज माघारी करण्याचा आखरी दिवस असताना एकतीस उमेदवारापैकी16 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. 31 उमेदवाराच्या 39 अर्ज प्रत्यक्षात मंजूर झाले होते .काही उमेदवारांचे दुपार अर्ज ही मंजूर झाले होते आज सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज माघार घेण्या साठी अनेक उमेदवारांनी तहसील कार्यालयात धाव घेतली होती. करमाळा विधानसभा मतदारसंघातील 31 पैकी 16 उमेदवारांची माघार व 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार यादी पुढील प्रमाणे
निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार
विकास आलदर (राष्ट्रीय समाज पक्ष), शहाजहान शेख (बहुजन समाज पार्टी), अतुल खूपसे (अपक्ष), सुहास ओहोळ (अपक्ष), बाळासाहेब वळेकर (अपक्ष), उदयसिंह देशमुख (जरांगे समर्थक), संजय शिंदे (अपक्ष), डॉ. सुजित शिंदे (अपक्ष), दत्तात्रय शिंदे (अपक्ष), पोपट पाटील (अपक्ष), सागर लोकरे, जितेंद्र गायकवाड (अपक्ष), संभाजी भोसले (अपक्ष)
निवडणुकीत उभे असलेले उमेदवार
नारायण पाटील ([महाविकास आघाडी] शरदचंद्र पवार गट), विद्यमान आमदार संजयमामा शिंदे (अपक्ष), दिग्विजय बागल ([महायुती] शिवसेना शिंदे गट), रामदास झोळ (अपक्ष), सिद्धार्थ वाघमारे (अपक्ष), जमीर शेख, जालिंदर कांबळे, धीरज कोळेकर, गणेश भानवसे, मधुकर मिसाळ, विनोद सीतापुरे, संजय शिंदे (बहुजन समाज पार्टी), अशोक वाघमोडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), अभिमन्यू अवचर (अपक्ष), संजय शिंदे (अपक्ष
31 उमेदवारापैकी 16 जणांनी माघार घेतली असुन एकुण 15 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत असे असले तरी करमाळा विधानसभा मतदार संघामध्ये यंदा प्रमुख चार उमेदवारामध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे.यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अपक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेना शिंदे गटाकडुन मकाईचे सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल अपक्ष म्हणुन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर या चौघांमध्ये विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे.राष्ट्रवादी शिवसेना अपक्षामध्ये ही निवडणुक होणार आहे.मतदार राजा नक्की कुणाला कौल देऊन निवडून देणार हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे.
