आ.संजयमामाची आमची विचारधारा वेगळी असल्यामुळे सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार नारायण पाटील यांना सावंत गटाचा पाठिंबा जाहीर
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे आमदार संजयमामा शिंदे यांनी कागदावरच विकास केला आम्हाला खरा विकास हवा असून विकासाच्या मुद्द्यावर माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिला असून भाजपची विचारधारा देवेंद्र फडवणीस यांना पाठिंबा दिला आमची पुरागामी विचारधारा असल्याने त्यांची विचारधारा वेगळी व आमची विचारधारा वेगळी असल्यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांना समर्थन दिले असल्याची माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत, राहुल सावंत, संजय सावंत यांनी दिली आहे.आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा तालुक्यात कोणीही परिचित नव्हते त्यावेळेस सावंत गटाचे नेते स्व.सुभाष अण्णा सावंत यांनी त्यांना खूप मोठे सहकार्य केले. आम्हीही त्यांना सहकार्य करून आमदारपदी विराजमान केले परंतु कोणालाही विचारात न घेता त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला. आमची विचारसरणी काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार,शिवसेना उध्दव ठाकरे यांच्याशी जुळती आहे. तसेच करमाळा शहर असो या इतर ठिकाणी त्यांनी जो विकास निधी दिला आहे थोडाफार त्याचे काम अजून चालू झाले नाही, अनेक अडचणीचा सामना त्यासाठी करावा लागतो. उद्या सकाळी दहा वाजता नालबंद मंगल कार्यालय येथे सावंत गटाचा मेळावा आयोजित केला आहे. पाठिंबा माजी आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला असून त्यांना आमदार करण्यासाठी सावंत गट काम करणार असल्याचे सांगितले आहे.
