Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासामाजिक

लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त पोथरे येथे रक्तदान शिबिर विविध कार्यक्रमाचे आयोजन – हरीश्चंद्र झिंजाडे

                    करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याचे लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त पोथरे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात दिनांक 12 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मान्यवरांच्या हस्ते दिगंबरराव बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी आठ वाजता करण्यात येणार असुन या शिबिराचे उद्घघाटन महाराष्ट्र राज्य साखर संचालक सौ. रश्मी दिदी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर रक्तदान शिबिर हे सकाळी साडेआठ ते पाच या वेळेस शनेश्वर सभागृह पोथरे येथे होणार आहे दिनांक 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या जनावरांचे डाळ खुरकत लसीकरण एसटी स्टँड पोथरे येथे होणार आहे. पशुधन विकास अधिकारी डाॅ. प्रवीण शिंदे, डॉक्टर मनीष यादव ,पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर भाऊसाहेब सरडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे हे करणार आहेत याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी माळवाडी पोथरे येथे विद्यार्थ्यांना फळे खाऊ वाटप व नवीन जार भेट देण्यात येणार आहे. दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता प्रगतशील शेतकरी विकास वाघमारे यांचे शेती या विषयावर मार्गदर्शन व रोप वाटपाचा ढेकळेवाडी पोथरे येथे कार्यक्रम संप्पन होणार आहे. सदर कार्यक्रमास पोथरे तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी युवक नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे माजी सरपंच पोथरे व शिवरत्न तरुण मंडळ व मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group