दत्तकला सीबीएसई स्कूलचा निकाल शंभर टक्के.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला सी बी एस ईस्कूल या शाळेचा सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली.
या शाळेतील महम्मद पठाण या विद्यार्थ्याने 92.20% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. हरशीका बिरवा हिने 88% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. मानव पोटे याने 87.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ओम धायगुडे 84%, कार्तिकी मीना 85%, श्लोक नहाने 83% गुण मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलच्या प्राचार्या सौ नंदा ताटे, सुप्रिया आटोळे, मयुरी कदम, गौरी पिसाळ, रघुनाथ झोळ, सगुना मनी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ, उपाध्यक्ष श्री राणादादा सूर्यवंशी, सचिवा सौ.माया झोळ व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर यांनी अभिनंदन केले.
