करमाळा शहरातील रेणुकानगर येथील नागरिकांना सुविधा न दिल्यास २८ मे ठिय्या बोंबाबोंब आंदोलन करणार- करन आलाट.
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषद हद्दीतील रेणुका नगर परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्या बाबत मनसे शहर उपाध्यक्ष करण (भाऊ) आलाट यांनी करमाळा नगरपरिषद तहसीलदार करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असुन मागण्या पुर्ण न झाल्यास २८ मेला ठिय्या आदोंलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या रेणुका नगर परिसरात ३० ते ३५ वर्षांपासून ४० ते ५० कुटुंब राहतात. त्या परिसरात अद्यापही रस्ते व गटारी सुविधा उपलब्ध नाही तसेच तेथील असणाऱ्या महिला व पुरुषांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध नाही .तेथील असणाऱ्या महिला शौचास उघड्यावर जातात तसेच काही महिला झाडांना पडदे लावून शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने तेथील परिसरात साथीचे रोग पसरून नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. तसेच परिसरात गटारी उपलब्ध नसल्याने येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच त्या ठिकाणी नगरपालिकेची घंटागाडी येत नाही…तरी नगर परिषद प्रशासनाने त्याठिकाणी शौचालय, गटारी व रस्ते उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा करमाळा नगर परिषद समोर रेणुका नगरमधील सर्व पिडीत नागरिकांसमवेत आम्ही दिनांक २८/०५/२०२४ रोजी ठिय्या आंदोलन करून बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत याची नगर परिषदेने दखल घ्यावी पीडित नागरिकाना नागरी सुविधा न पुरविल्यामुळे आदोलन करण्याऱ्याची पूर्ण जबाबदारी नगर पालिकेतील मुख्याधिकारी याची असेल याची करमाळा नगर पालिकेने नोंद घ्यावी वरील आमच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
