करमाळा

रावगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बुधवंत यांची बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड

करमाळा प्रतिनिधी वबहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघ महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका प्रदेशाध्यक्ष सौ. लक्ष्मीताई गरकळ यांनी करमाळा तालुक्यातील रावगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बुधवंत यांची बहुभाविक भाऊबाबा वंजारी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. आपण सामाजिक बांधिलकी व स्वधर्म रक्षण या आपल्या कर्तव्यासाठी आम्हाला सामाजिक कार्यात, विश्वासाने व एकनिष्ठेने साथ दयाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.लक्ष्मण बुधवंत हे आपल्या कालिंदा फाऊंडेशन पुणे तसेच वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यामध्ये दरवर्षी रावगांव शेजारील वाड्यावस्त्यांच्या शालेय साहित्य वाटप, रुग्णालयात जावून रुग्णांना मदत तसेच फळे वाटप, दिवाळीमध्ये गोरगरिबांना फराळ वाटप, कोरोना काळात रुग्णांना मदत, तसेच रावगांव येथील नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर बांधण्याचे उत्कृष्ट कामकाज ते करत आहेत. तसेच करमाळा तालुक्यातील भक्तांना दर्शनासाठी तिरुपती बालाजी दर्शन यात्रा घडवितात अशा विविध कार्यक्रमाची दखल घेत वर्ल्ड ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कमीशन नवी दिल्ली यांच्यावतीने ही डॉक्टरेट पदवीने लक्ष्मण बुधवंत यांचा सन्मान केला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वंजारी बहुभाषिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे करमाळा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group