चिखलठाण विकासाचे रोल मॉडेल म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात ओळखले जाईल – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी चिखलठाण गाव करमाळा तालुक्यात विकासाचे रोल मॉडेल म्हणुन ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. ते चिखलठाण येथे ग्रामपंचायतीच्या नुतन कार्यालयाच्या व विविध विकासकामांच्या उद्घघाटन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते . यावेळी व्यासपीठावर चिखलठाणचे सरंपच. व कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक चंद्रकांत काका सरडे , माजी जिल्हा परिषद सदस्य वामनदादा बदे मा जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी काँग्रेसआयचे तालुकाअध्यक्ष दादासाहेब लबडे ,कंदरचे सरपंच भास्कर आण्णा भांगे ,अर्बन बँकेचे चेअरमन नगरसेवक कन्हैयालाल देवी ,आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीबापु झोळ , जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप ,युवा नेते सुनिल बापु सावंत उपसरपंच आप्पासाहेब सरडे, माजी उपसरपंच अमोल मराळ यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळीबोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की चंद्रकांत काका सरडे एक उच्च शिक्षित नेतृत्व असुन चिखलठाण सह परिसरातील गावच्या विकासासाठी ते सतत पाठपुरवा करत असतात. सुशिक्षित व खंबिर नेतृत्वा कडे सत्ता असल्यास विकास कामे मंजुर करणे व ती प्रभावी पणे राबवणे सोपे जाते हेच चिखलठाणच्या विविध विकास कामामुळे दिसुन येते आहे. भविष्यात चिखलठाण हे गाव करमाळा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचे रोल मॉडेल ठरेल असे गौरवोद्गगार आ. संजयमामा शिंदे यांनी काढले. तसेच भविष्यात चिखलठाण च्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले.

करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली चिखलठाणचा चेहरमोहरा बदलणार आहे. सध्या गावातील सर्व समाज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, गावातील बंदिस्त गटारी, हायमास्ट दिवे यांची कामे पुर्ण झाली असुन येत्या काळात गावांतर्गत सर्व रस्ते कॉंक्रीटीकरण करणार आहोत..- सरपंच चंद्रकात काका सरडे
