Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

डिकसळ येथील पुलाचा काही भाग कोसळला असे समजताच मा. आमदार नारायण(आबा)पाटील यांनी दिली घटनास्थळी भेट

प्रतिनिधी डिकसळ पुलास माजी आमदार नारायण पाटील यांनी भेट दिली असून या पुलाच्या सक्षमीकरण कामासाठी शासनदरबारी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. याबाबत बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की डिकसळ पुल नादुरुस्त असल्याने जवळपास तीस गावांना याचा फटका बसत असून थेट दळणवळणावर याचा परिणाम होत आहे. ही बाब नागरिंकडून आपल्या निदर्शनास आल्याने आज प्रत्यक्ष पुलास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. हा पुल ब्रिटीशकालीन असून या पुलाचे आॅडीट होऊन तात्काळ या पुलाची दुरुस्ती केली जावी. आपण या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून या समस्येचे गांभिर्य सांगणार आहोत. या पुलाच्या कामासाठी विशेष निधी मिळावा म्हणून आपण पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.
हा पुल आता धोकेदायक बनला असून एकभाग ढाळसला गेला आहे. सध्या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम चालू असल्याने ऊस वाहतूकीसाठी हा पूल महत्वाचा दुवा ठरत होता. पश्चिम भागात लाखो मेट्रीक टन ऊस असल्याने आता ऊस वाहतूक सुद्धा खोळंबली गेली. याघा परिणाम वर्षभर जोपासलेल्या ऊस पिकावर होत असून शेतकऱ्याची आर्थिक हानी नजरेसमोर दिसून येणार त आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागासाठी हा पुल दुरुस्त होणे गरजेचे असल्याने नागरिकांच्या दळणवळण सुविधेस प्रथम प्राधान्य देणे मला महत्त्वाचे वाटते. याच उद्देशाने आपण पश्चिम भागातील जिंती-कोर्टी रस्त्यास थेट केंद्रसरकारकडून निधी आणून तीस वर्षाहुन अधिकाळ रखडलेला हा प्रश्न कायमचा सोडवला. याच धर्तीवर आता डिकसळ पूलाच्या कामासही आपण महत्त्व देऊन पाठपुरावा करुन हा प्रश्न सोडवणार असल्याचे माथी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.



error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group