डिकसळ पुलाचा काही भाग कोसळला असल्याने या परिस्थितीला जबाबदार कोण प्रा.रामदास झोळ सरांचा सवाल
करमाळा प्रतिनिधी डिकसळ पुलाचा काही भाग कोसळला असुन आता त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असुध सामान्य लोकांच्या आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी, शेतीसाठी लागणारी खते, बी-बीयाने, अवजारे इत्यादी गोष्टींसाठी बारामती, भिगवणला जाण्याचा जवळचा मार्ग बंद झाला असल्याने या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांनी व्यक्त केले आहे .करमाळा तालुक्यातील 30 गावातील नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाले असून उद्योग व्यवसाय शिक्षण यावर याचा परिणाम होणार असून वाहतुकीच्या गैरसोयीमुळे दळणवळणाचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचे ऑडिट स्ट्रक्चर झाले त्यावेळेस पुलाची डागडुजी करण्यास तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता असे असताना सत्ताधारी विरोधक यांनीही या प्रश्नाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करून केवळ श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला मूळ प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने डिकसळ पुलाचा बळी गेला आहे. करमाळा तालुक्यातील जनता सोशिक असून लोक सुशिक्षित असूनही समन्वयाचा अभाव असल्यामुळे डिकसळ पुलाची अवस्था अशी झाली आहे याची जबाबदारी कोण घेणार कोरोनाकाळात पोलिस यंत्रणेचा योग्य वापर करून अवैध वाहतुकीवर आळा घातला होता मात्र त्यानंतर प्रशासनाने जर पोलिस यंत्रणेचा उपयोग केला असता तर ही घटना टाळता येणे शक्य होते असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे.
