नगरसेविका राजश्री माने यांच्यावतीने प्रभाग 4 व 8 मधील नागरिकांसाठी 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर कोरोना लस सर्टिफिकेट युनीवर्सल पास वाटप शिबिर
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.राजश्री दत्तात्रय माने यांच्या वतीने करमाळा शहरातील प्रभाग क्र.४ व ८ मधील नागरीकांसाठी २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर पर्यंत सलग तीन दिवस कोरोना लसीचे सर्टिफिकेट व युनिवर्सल पास मोफत काढुन मिळण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्या सर्व शासकीय कार्यालयात,बॅंकेत,प्रवासासाठी कोरोना लसीचा डोस घेतलेले सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.हे शिबीर सकाळी ११ ते ५ याळेत कानाडगल्ली येथील भाजी मंडई जवळ असलेल्या संपर्क कार्यालयात होणार आहे. ज्या नागरीकांचे व महिलांचे कोरोना लसीचे दोन डोस पुर्ण झालेले असेल,अशांनी डोस घेतेवेळी दिलेला आपला मोबाईल नंबर घेवुन शिबीरास्थळी यावे.तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी ९७६३०६०५६५, ८०५५८४०३१३ या क्रमांकावर संपर्क साधावा;असे आवाहन करण्यात आले आहे.
