दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली मकाईचे यशस्वी गाळप सुरू शेतकऱ्याच्या खात्यावर 2200 रुपये पहिला हप्ता जमा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्यांने २०२१-२२ या हंगाममध्ये गाळप केलेल्या ऊसाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. याबरोबर कारखान्याने आसवनी प्रकल्पही सुरु झाला असून यातून उत्पादन झालेल्या पहिल्या टॅंकरचे पूजन करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना बागल गटाचे युवा नेते दिग्विजय प्रिन्स बागल यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी अडचणीतून मार्ग काढत सुरु झाला असून काटकसरीचे धोरण स्वीकारत सुरु झालेला हा कारखाना सध्या योग्य दिशेने यशस्वीपणे वाटचाल करीत गाळप सुरू आहे . त्यातच ऊसाचा पहिला हप्ता २२०० रुपयांनी जमा झाला असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या वर्षात ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे.याबरोबर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगाम 2021- 22 मध्ये आसवनी प्रकल्पातून उत्पादीत झालेल्या स्पिरिटच्या पहिल्या टँकरचे पूजन केले आहे.यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तम विठ्ठल पांढरे, संचालक नंदकिशोर भोसले, रामचंद्र हाके, कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे, कार्यालयीन अधिक्षक एल. ए. बनसोडे, डिस्टिलरी मॅनेजर संकेत बागल, खरेदी अधिकारी एम. डी. रोकडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
