महाराष्ट्र मराठा सोयरिक संघाचा 5 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील भोर येथे मोफत राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा -नागनाथ बागल सर
करमाळा प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर येथे दिनांक रविवार 5 डिसेंबर 2021महाराष्ट्र मराठा सोयरिक चा पहिला विनाशुल्क राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन सकाळी नऊ ते पाच या वेळेत अभिजित मंगल कार्यालय भोर येथे करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र मराठा सोयरिक संघाचे अध्यक्ष नागनाथ बागल सर यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची म्हत्वाची मीटिंग भोर शहरात आयोजित करून बैठकीमध्ये मेळावा यशस्वी करणेचे दृष्टिने विचार विनिमय होऊन , मेळाव्यातील जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत बैठकीला महाराष्ट्र मराठा सोयरिक या संकल्पनेचे संस्थापक *अध्यक्ष मा श्री नागनाथ बागल व उपाध्यक्ष मा श्री मनोजकुमार गोरे* हे पूर्णवेळ उपस्थित होते,
पुणे जिल्ह्यातील संपन्न होणारा हा महाराष्ट्र मराठा सोयरिक चा पहिलाच मेळावा असणार आहे, त्याच बरोबर सोलापूर,उस्मानाबाद,उदगीर,पुणे कोल्हापूर, सांगली,या जिल्यातील 128 मराठा सोयरिक ग्रुपही कार्यरत आहेत.मेळाव्यामध्ये पाल्य व पालक यांना सर्व सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.तरी सर्व मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, प्रा रामदास सुरवसे सर श्री कुमकर. प्रा.सौ. गायकवाड प्रा. महाडिक प्रा.पाटिल शिंदे सर थोपटे सर गोरड सर श्री संजय शिरवले वाडकर सर पवार सर संजय खरमरे राजिवडे मॅडम श्री खाटपे श्री लेकावळे श्री अमर बुदगुडे श्री दिघे श्री गोळे प्राचार्य रवी सुरवसे श्री गणेश गवळी ,श्री बजीरंग दत्तू ,प्राजक्ता बागल,श्री अजय पाटील श्री राजेंद्रपाटील,श्री,सुधीर भाऊ भोसलेश्री उत्तम नाना अमृतराव ,श्री सतीश काकडे,श्रीअनंतराव शिंदे,श्री वसंत मस्के सरश्री माधवराव गंभीर श्री सुखदेव यादव श्री मोहन वाघ श्री टी पी गायकवाड सर शिवश्री दत्ताजी शिंदे श्री सूरज पाटील श्री पंकज पिंगळे ,श्रीअनंतराव सूर्यवंशी पत्रकार दिनेश मडके ,श्री उमाजी गायकवाड श्री अवधुम्बर ढावरे यांनी केले आहे.
