वीटमधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याचा ठराव
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वीट येथील अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. काम झाल्यानंतर तीन महिन्यातच रस्ते उकडले आहेत. या रस्त्याची गुणवत्ताविभागाकडून तपासणी करण्यात आली मात्र याचा अहवाल देण्यात आला नाही. याला जबाबदार असलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्यात यावी. या मागणीचा ठराव ग्रामसभेने केला आहे. वेळीच याची दखल घेतली नाही तर शनिवारी (ता. 4) आमरण उपोषण केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.याला जबाबदार असलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा या मागणीचा ठराव ग्रामसभेने केला आहे. वेळीच याची दखल घेतली नाही तर शनिवारी (ता. 4) आमरण उपोषण केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील वीट येथील समाधान कांबळे म्हणाले, गावात जनसुविधा योजनेअंतर्गत रस्ते झाले आहेत. मात्र तीन महिन्यातच हे रस्ते उकडले आहेत. या रस्त्यासाठी आम्ही दहा महिन्यापासून चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर राज्य गुणवत्ता निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. मात्र या कामाचे संबंधित कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांनी तपासणी अहवाल दिला नाही. असे लेखी देण्यात आले आहे.मात्र हा अहवाल देण्यापूर्वीच दुसऱ्या अधिकाऱ्याने अहवाल दिला नसल्याचे पत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ तारखेला ग्रामपंचायतीने ग्रामसभेत व मासिक बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे, असेही कांबळे यांनी सांगितले आहे.
