दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्यावतीने सर्वोतपारी मदत करणार-सरपंच डॉ. अमोल दुरंदे
करमाळा प्रतिनिधी अपंग स्वयंसहायता समूहा तर्फे राजुरीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात आज 3 डिसेंबर रोजी *जागतिक दिव्यांग दिन* साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुरंदे,नंदकुमार जगताप,ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, तलाठी चव्हाण भाऊसाहेब,बचत गटाचे शिंदे साहेब , येवले साहेब,सावडी ग्रामसंघाच्या अध्यक्ष जाधव मॅडम, राजुरी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. रेखा शिंदे, crp नवगिरे ताई , लांडगे ताई, महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव तसेच बहुसंख्येने दिव्यांग उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा शिंदे यांनी केले , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अमोल दुरंदे होते. डॉ. दुरंदे म्हणाले, 1992 साली संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यास सुरवात केली, त्यांनतर 2016 साली भारतात दिव्यांगाचा स्वतंत्र कायदा तयार झाला, यामध्ये दिव्यांग व्यक्तींना 40 टक्के अपंगत्व असल्यास शासकीय नोकरीत व शासनाच्या विविध योजनेत समाविष्ट करण्यात आले, क आणि ड श्रेणी वर्गात 3टक्के आरक्षण देण्यात आले,अपंगत्व अनुवांशिक, अपघात व आजाराने येते.21प्रकारच्या आजारांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते.त्यामुळे उपस्थित सर्वं दिव्यांगानी प्रथम ऑनलाईन प्रमाणपत्र सिव्हिल हॉस्पिटल,सोलापूर येथून काढावे लागतील तेव्हाच आपल्याला शासकीय योजनाचा लाभ घेता येईल. मागील दोन वर्षांपूर्वी 14व्या वित्त आयोगातून व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या 13 दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहनपर निधी देण्यात आला.त्याचप्रमाणे कोविडच्या दोन वर्षानंतर यावेळी दिव्यांगासाठी कृषी व यशस्वी बचत गटाच्या स्थळानां भेटी देण्यात येतील, त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या दिव्यांगासाठी निधी देण्यात येईल. परंतु दिव्यांगानी शासनाच्या थोडक्या निधीवर अवलंबून न राहता, मोठी स्वप्न बघितली पाहिजे,वयाच्या 8व्या वर्षी दोन्ही हात अपघाताने गेले असतांना इच्छा शक्तीने जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ् समीर घोष होऊ शकतात , एका हाताने पोलिओ असतानाही आपल्या फिरकी गोलंदाजीने भुरळ पाडणारे चंद्रशेखर, अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे स्वतः अंध असणारे लुइस ब्रेल यांनी अंधासाठी ब्रेल लिपी शोधून काढली, आपल्याच करमाळा तालुक्यातील सुयश जाधव ने पेरा ऑलिम्पिक गाठली अश्या दिव्यांग व्यक्तींनी खचून न जाता प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाणे उच्च धैय गाठले त्यामुळे आपणही मोठी स्वप्न बघा. दिव्यांग विद्यार्थांयामध्ये कुणाला स्पर्धा स्पर्धा परीक्षा करावयाची असल्यास त्याचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी करतो तुम्ही फक्त पुढे या,एक गरीब शेतकरी कुटुंबातील अंध मुलगी कलेक्टर होऊ शकते तर आपण का नाही होऊ शकत, याचा विचार होणे गरजेचे आहे , महिला बचत गटासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र्य खोली व त्याला फर्निचर देण्यात येईल.दिव्यांग सहायता बचत गटातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.याच वेळी काही दिव्यांग व्यक्तींनी करमाळा येथेच प्रमाणपत्र मिळावे असा प्रश्न विचारले असता, सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना मिटिंग मधून कॉल केला असता आमदार साहेबांनी हा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल असे सांगितले.यावेळी नंदकुमार जगताप,ग्रामसेवक रामेश्वर गलांडे ,उमेद करमाळा तालुका अध्यक्ष शिंदे सर , सावडीच्या अध्यक्षा जाधव मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र हंबीराव, संजय गायकवाड, राजेंद्र सारंगकर यांनी परिश्रम केले.