वाशिंबेच्या दत्तकला तरुण मंडळाचा गणेशोत्सव थाटात जल्लोषात संप्पन
वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे येथील दत्तकला बहुउदेशीय व संशोधन संस्था संचलित दत्तकला तरूण मंडळाचा गणपती मिरवणूक धुमधडाक्यात पार पडली.पारपांरिक वाद्यांच्या ढोल,हलगीपथक,डिजे सह तालात गणरायाची जल्लोषात मिरवणूक झाली.
श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे.वाशिंबेच्या दत्तकला तरुण मंडळाचा गणेशोत्सव थाटात जल्लोषात संप्पन झाला.
