भैरवनाथमुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटला ! प्रा.शिवाजी सावंत
भैरवनाथचा 12 वा अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात.
केत्तूर (अभय माने) ऊस पीकास हमीभाव व शाश्वती असल्याने करमाळा तालुका व कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जास्तीत ऊस पीक घेण्याकडे कल वाढलेला असून,उजनी कोळगांव आदी धरणाचे पाणलोट क्षेत्रात यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने तसेच उपयुक्त पाणी साठपाच्या स्त्रोतावर दरवर्षी ऊसाचे उत्पादन वरचेवर वाढत चालल्याने तालुक्यातील व कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न वारंवार भेडसावला आहे.
परंतू कारखान्याचे संस्थापक तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनानुसार आमचे विहाळ येथील युनिटने कारखाना उभारणी पासून ते आजपर्यंत अतिरिक्त ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम केले असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावरील असणारा विश्वास दृढ झाला असल्याचे गौरोदगार कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजी सावंत यांनी बॉयलर पुजनाप्रसंगी काढले.
प्रारंभी सत्यनारायणची महापुजा कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी भगवान सानप व उज्वला सानप या उभयतांच्या हस्ते तसेच गणेशकाका कुलकर्णी व त्यांचे सहयोगी यांचे मंत्रोच्वारात संपन्न झाली.
यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत,उपाध्यक्ष अनिल सावंत,धाराशीव जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत,आलेगावंचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत,वाशीचे कार्यकारी संचालक ॲड.विक्रम सावंत,विहाळचे माजी सरपंच काशीनाथ भुजबळ,दादासो कोकरे,स्वप्नील गोडगे, सरल स्केलचे संचालक अजिश नंम्बीयार,ऊस उत्पादक भजनदास खटके,संजय ढेरे,गजूकाका सुर्यवंशी,शिवराज रोकडे,हनुमंत गोडगे,महादेव नवले,रामदास गुंडगिरे, यांच्यासह,जनरल मॅनेजर रवीराज भोसले,प्रोसेस मॅनेजर संजय जाधव,चिफ अकौंटंट रामचंद्र कारंडे,जनरल पर्यवेक्षक राजेंद्र भुसारे,कार्यालयीन अधीक्षक रवींद्र -विघ्ने पाटील,ऊस पुरवठा अधिकारी रामभाऊ चव्हाण-पाटील,केनयार्ड सुपरवायझर पांडुरंग जमाले,स्टोअर किपर लक्ष्मण निडवंचे,गोडावून किपर बाळू काळे,कॅम्प सुपरवायझर पप्पु सुर्यवंशी तसेच सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
*यावर्षीही राज्यात तसेच कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे पीक प्रचंड प्रमाणात असल्याने साखर आयुक्त यांचे आदेशान्वये यावर्षीचा गाळप हंगाम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कारखान्यातील सर्व मशिनरींची ओव्हरव्हॉलींग,सव्हींसींग व रिपेअरिंगची कामे पूर्ण करुन कारखाना गाळपास सज्ज केला आहे.व्यवस्थापनाचे यावर्षी सात लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून,कारखान्यास आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टर,ट्रॅक्टर बैलगाडी आणि ऊस तोडणी यंत्रामागील वाहनांचे करार पूर्ण करुन ऊस गाळपास आणण्याचे योग्य नियोजन शेती विभागामार्फत करण्यात आलेले आहे.त्याकरिता सर्व सभासद,बिगर सभासद व ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपास पाठवून देवून उद्दीष्टपूर्ती पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण सावंत यांनी केले.
