करमाळा तालुक्यातील लंम्पी आजाराचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पशुपालकांनी घाबरून जाऊ नये – गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी सध्या महाराष्ट्रासह देशात लंम्पी या आजाराने थैमान घातले असल्याकारणाने माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार करमाळा तहसील येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये करमाळ्यातील सध्या असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला ,तसेच लक्षणे आढळलेल्या जनावरांच्या रक्ताचे नमुने विभागीय रोग अन्वेषण निदान प्रयोग शाळा औंध – पुणे ६७ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तरी त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुधनांची काळजी घ्यावी, तसेच गोठ्यामध्ये व आजूबाजूस
स्वच्छता ठेवावी, व बाहेर तालुक्यातून पशुंची खरेदी करण्याचे टाळावे असे भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे, या बैठकीसाठी तहसीलदार समीर माने ,बिडिओ मनोज राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण शिंदे ,डॉक्टर कांबळे व भाजपाचे तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, पांडे गावचे उपसरपंच नितीन निकम ,विशाल साळुंखे, विनोद इंदलकर व पशुधिकारी उपस्थित होते ,
