घरतवाडी गाव विकायची स्टॅंटबाजी करू नये विकासकामांसाठी विकासकामात अडथळा आणु नये – ॲड अजित विघ्ने
केत्तुर प्रतिनिधी
काल परवा दिवाळीच्या सुट्टीत लोकप्रतिनिधीना टार्गेट करून आणि सर्वसामान्य लोकांचा गैरसमज करून – घरतवाडी गाव विकायला काढले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.. गाव, खेडी सुधारलीच पाहीजेत.. विकासकामांसाठी प्रत्येकाने आग्रही राहीलेच पाहीजे.*
विकासकामात राजकारण न आणता प्रत्येकाने आपल्या गावासाठी, परिसरासाठी एकत्र आले पाहिजेत यात गैर काहीच नाही.. विधायक कामे करायला एकत्र आलेच पाहीजे परंतु चुकीची आणि दिशाभुल करणारी माहीती देऊन राजकारणासाठी जर कोणी वापर करणार असतील तर नक्कीच चुकीचेच ठरेल.
*घरतवाडीचा रस्ता व्हावा ही प्रत्येकाचीच इच्छा आहे, त्यासाठी झटले पाहीजे, हे ही खरे आहे. परंतु कोणी दिशाभुल करणार असेल तर त्याचे स्पष्टीकरण देखिल दिलेच पाहिजे*
* वस्तुतः कुंभारगाव ते घरतवाडी रस्ता हा ग्रामिण मार्ग क्रमांक-5 असुन, सन-2021/22 मधे 30+54 मधुन 7.5 लाखास मंजुरीही देण्यात आली होती, परंतु स्थानिक ग्रामपंचायतीने सदरचे रस्त्याचे काम करणेस नकार दिला.. त्यामुळे हे 1 कि.मी चे काम टेंडर प्रक्रिया करून पुन्हा प्रसिध्द केले असुन, दोन ते तीन दिवसात टेंडर प्रक्रिया होवुन, हे मंजुर काम चालु होईल. तसेच मामांनी देखिल दहा लाखांचा रस्ता प्रस्तावित केलेला असुन लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळेल.
*गावासाठी एकत्र येऊन झटलेच पाहीजे, यात काहीच गैर नाही परंतु विकासकामात राजकारण आणुन वेगळी दिशा देण्याचे धोरण काही मंडळीचे आहे ते कोणीही करू नये*
लोकप्रतिनिधी हा गावचे सरपंचापासुन, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार पर्यंत असतात, जे आपआपल्या मतदार संघातुन निवडुन आलेले असतात व त्यांचे पाच वर्षाचे कार्यकाळात जुन्या रखडलेल्या योजना आणि नविन विकासकामांना चालना देण्याचे काम करावे लागते..परंतु काही धुरंदर मंडळी वारंवार चुकीची माहीती देऊन होणाऱ्या विकासकामात अडथळे आणतात, असे अडथळे कोणीही आणु नयेत.. यामुळे आपलाच विकास खुंटतो.
*शासनाचे हॅम योजनेतुन करपडी. ता- कर्जत ते कुंभेज फाटा. ता- करमाळा हे काम प्रगतिपथावर असुन, सदरचा रस्ता मांजरगाव ते उमरड दरम्यान काही शेतकरी बांधवांनी अडविला आहे.. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यास कोणाचाही विरोध नाही, परंतु त्यांनी असे बेकायदेशिरपणे अडथळे निर्माण करणेही योग्य नाही. वास्तविक सदरचा रस्ता हा सन-1960 पासुनचा अस्तित्वात असलेला रस्ता असुन, वीस वर्षापेक्षा जास्त कालावधीत येथे सार्वजनिक वहीवाट आहे. त्यामुळे रस्त्याला अडथळा न देता संबधित शेतकऱ्यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू ठेवावी, परंतु सर्वसामान्य नागरिकांचे आणि स्वतःचे नुकसान करू नये. याबाबतही काही राजकीय मंडळी काम होऊ नये म्हणुन फुस लावत असतील तर हे त्यांनी कृपया करू नये.*
केंद्रीय निधीतुन होत असणारे कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असुन, या ठिकाणी काही प्रमाणात असलेले अडथळे दूर झालेले आहेत.. फक्त संबधित कॉन्ट्रक्टर यांनी रस्त्याची क्वालिटी मेनटेन ठेवावी.. व प्रवाशांनीही सहकार्य करावे.
*कोरोनाचा कालावधी, सरकारची परिस्थिती आणि मागील सरकारच्या काळातील मंजुर योजनांना नविन सरकारने दिलेली स्थगिती यामुळे काही कामे मंजुर असुनही चालु झालेली नाहीत परंतु ही स्थगिती हळुहळु उठविली जात असुन, डिकसळ पुल- रस्ता, खातगाव पुल- रस्ते, तसेच तालुक्यातील इतर ठिकाणचे अनेक छोटे मोठ्या रस्त्यांची कामे चालु होतील, फक्त याला कोणीही अडथळे आणण्याचे पाप करू नये. कृपया विकास कामात कोणीही राजकारण आणु नये, तरच आपल्या तालुक्याची भरभराट होईल..*
कृपया प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कार्यकर्त्यांनी करू नये. आपल्या गावचा, तालुक्याचा विकासरथ पुढे नेहण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवावी.
*आपले आमदार. संजयमामा शिंदे हे सोलापुर जिल्ह्याचे कणखर नेतृत्व असुन सरपंच पदापासुन, जिल्हा परिषद सदस्य – अध्यक्ष ते आमदार पर्यंतचा प्रवास संघर्षमय असुनही संयमाने केला आहे. त्यांचेकडे अनुभवाची मोठी शिदोरी असुन त्यांचेकडुन तालुक्याचा सर्वांगिण विकास होईल याचा विश्वास जनता जनार्दनाना आहे. आज कुकडी, दहीगाव, कोळगाव योजनांना वाढीव निधी( सुप्रमा)आणुन सिंचनाचे दृष्टीने तालुका स्वयंपुर्ण होण्याचे नियोजन केले आहे. विजेच्या बाबतीतही उपकेंद्रे, नवीन ट्रान्सफार्मर वैगेरे साठी निधी उपलब्ध करून दिलेला असुन अनेक प्रस्तावित कामे लवकरच चालु होतील. आरोग्याचे दृष्टीने करमाळा कॉटेज रुग्णालया सहीत, जेऊर, कुर्डुवाडी येथिल रुग्णालयांना कोट्यावधीचा निधी मिळविला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाही तालुक्यासाठी विविध निधी त्यांनी दिलेला असुन, आता हा विकासरथ चालुच राहणार आहे.*
