लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त पोथरे येथे शिवरत्न मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर संप्पन
करमाळा प्रतिनिधी लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त पोथरे येथे शिवरत्न मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साखर संचालीका रश्मी बागल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. शनेश्वर सभागृह येथे झालेल्या रक्तदान शिबिरात ४१ व्यक्तीने रक्तदान केले.
यावेळी माजी सरपंच सोपान शिंदे, आदिनाथचे संचालक प्रकाश पाटील, पोथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थचे संचालक किसन झिंजाडे, सरपंच धनंजय झिंजाडे, उपसरपंच दिपाली जाधव, शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, माजी सरपंच ज्ञानदेव नायकोडे, बबन नंदरगे, विष्णू रंदवे, ग्रामपंचायत सदस्य रघूविर जाधव, विशाल झिंजाडे, शांतीलाल झिंजाडे, पाराजी शिंदे, संतोष ठोंबरे, रोजगार सेवक दत्तात्रय हिरडे, अनिल दळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बप्पा शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ब्लड संकलन श्री कमला भवानी ब्लड बँक करमाळा यांनी ब्लड संकलन केले तर बँकेचे कर्मचारी ऋषिकेश धस, कृष्णा पवार, उमाकांत उंबरे, पौर्णिमा राऊत, राधिका सरडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर झिंजाडे, विलास साळुंखे, दीपक शिंदे, संदीप नंदरगे, संग्राम आढाव, शांतीलाल झिंजाडे, यांनी परिश्रम घेतले.
