जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबा द्यावा-आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच अपुऱ्या सुविधा व्यवस्थित कराव्या अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॕनेजर यांच्याकडे केली आहे.
आमदार संजयमामांचे मुंबई येथील स्वीय सहाय्य्क श्री समाधान कांबळे यांनी जनरल मॅनेजर यांना भेटून पत्र दिले व मामांची दूरध्वनी वरून चर्चा झाली आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून निश्चितपणे जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेस सह इतर मागण्या येत्या काही दिवसांमध्ये थांबा मिळावण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत जनरल मॕनेजर यांनी व्यक्त केले.
ही गाडीला थांबा दिल्यास पुणे, मुंबई, सोलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. करमाळा तालुक्यासह कर्जत-जामखेड, परंडा या परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे.
