भावकीतील भांडण जमीनाच्या कारणावरून दोघा जणांची एकास मारहाण
करमाळा प्रतिनिधी : जमिनीच्या कारणावरून दोघा जणांनी एकास ऊस तोडायच्या कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार २३ जुलैला सकाळी अकरा वाजता कुंभारगाव (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी बिभिषण तानाजी पानसरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की समाईक रस्त्यावरून २३ जुलैला सकाळी अकरा वाजता माझे चुलते रामदास भानुदास पानसरे हे जात असताना तू जमीन का घेतली याचा राग मनात धरून शिवाजी भानुदास पानसरे याने खोऱ्याच्या दांड्याने खांद्यावर व डाव्या हातावर मारहाण केली. तर चिमाजी शिवाजी पानसरे याने कोयता मारून जखमी केले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
