करमाळा

करमाळा येथील नवनाथ क्षिरसागर यांच्या ब्लड कॅन्सरने त्रस्त मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी भवानीपेठ करमाळा येथील नवनाथ क्षिरसागर यांचा बारा वर्षाचा एकलुता एक मुलगा ब्लड कॅन्सरने त्रस्त आहे. त्याच्या वैद्यकीय उपचाराकरता मदत करण्याचे आवाहन मुलाचे वडील नवनाथ क्षिरसागर यांनी केले आहे . सध्या त्याला उपचारासाठी 20/4/2023 पासुन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे पुढील उपचारासाठी ऍडमिट केलेले आहे.सर्व तपासण्या केल्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी ९०००००/- रूपये (नऊ लाख रुपये ) एवढा खर्च येईल असे सांगितले आहे.नवनाथ शिरसागर एक कुंभार व्यवसायिक असून त्यांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील उपचार करण्याकरीता ते असमर्थ आहे. त्यांच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी, त्याला पुढील उपचारासाठी तुमच्या आर्थिक मदतीची फार फार गरज आहे.तरी तुम्हाला जसे शक्य असेल तशी मला आर्थिक मदत करावी. तुमच्या अनमोल मदतीमुळे माझ्या मुलाचे प्राण वाचण्यास मदत होईल.मी आणि माझे कुटुंब तुमच्या सदैव ऋणात राहू असे नवनाथ क्षिरसागर यांनी म्हटले आहे.

माझा मोबाईल क्रमांक -8605420524
बँकेचे डिटेल्स — श्री.नवनाथ विठ्ठल क्षिरसागर(कुंभार)
Bank of India
A/c 0716 10110013008
IFSC -BKID000716 फोन पे नं 9421068806

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group