Uncategorized

वारीच्या नावाखाली सीना कोळगाव धरणातील पाणी पळवण्याचा घाट यशस्वी होऊ देणार नाही-सतिश नीळ

 

करमाळा प्रतिनिधी
सीना कोळगाव प्रकल्पा मध्ये अत्यल्प प्रमाणात पाणी साठा राहीला आहे.पाणी पातळी डेड स्टॉक मध्ये गेली आहे.परंतू वारीच्या नावाखाली पाणी सोडण्याचा घाट काही जणांकडून घालण्यात आला आहे.जर सीना कोळगाव धरणातून वारीच्या नावाखाली पाणी सोडले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सीना कोळगाव धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग धाराशिव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सदर निवेदनात म्हटले आहे कि धरणग्रस्त बांधवांनी घरे,जमीनी धरणासाठी देऊन त्याग केला आहे.जून संपत आला तरी पाऊस पडला नाही पाण्या अभावी उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत. पाणी पातळी खालावल्याने केबल. पाईप वाढवावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव (ह) आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कौडगाव व परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. विनाकारण कोणी तरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी सहन करणार नाही.तरीही पाणी सोडल्यास आम्हा धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे नीळ यांनी म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रति पोलिस निरीक्षक करमाळा परांडा.तहसीलदार करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group