करमाळासकारात्मक

करमाळा मनसेच्या मागणीला यश.. दत्त मंदीर ते कोर्ट मुख्य रस्त्याचे दुरूस्तीचे काम चालु….

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मुख्य सरकारी ऑफीस काॅलेज कोर्ट येथील जाणारा दत्त मंदिर ते विश्रामगृह हा मुख्य रस्ता असुन त्याची अवस्था खराब झालेली दिसुन येत होती  तरी त्याची ताबडतोब दुरूस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संजय (बापु)घोलप यांनी जि.प.करमाळा यांच्याकडे मागणी केली होती
सदरील रस्ता दुरूस्ती होण्याची गरज असुन सर्व पुण्याकडे जाणारी जड वाहने येथुनच जातात तरी रस्त्यावर दुरूस्ती न झाल्यास घात पात होण्याची जास्त शक्यता नाकारता येत नव्हती. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय चे विद्यार्थी, सर्व सरकारी कर्मचारी,कोर्ट यांची वर्दळ जास्त असल्यामुळे व घातपात घडु नये म्हणून रस्ता दुरूस्ती होणे  महत्वाचे होते त्याला आता यश मिळाले असुन जर हा रस्ता 15 दिवसांत दुरूस्त झाला नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने आंदोलन करून रस्तावर खड्डे खांदुन विध्यार्थीकडुन वृक्षारोपण करू असा ईशारा मनसे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी दिला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे …
error: Don\'t try to copy. Content is protected !!