करमाळाताज्या घडामोडीराजकीय

शिवसेना शिंदे गटाच्या करमाळा शहर उपप्रमुखपदी नागेश गुरव यांची निवड

करमाळा प्रतिनिधी    शिवसेना  (शिंदे गट) करमाळा शहराच्या उपप्रमुखपदी नागेश गुरव यांची तर उपतालुकाप्रमुखपदी दादासाहेब थोरात यांची निवड झाली आहे. त्यांना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते सचिव संजय मोरे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे शहरप्रमुख संजय शिलवंत उपस्थित होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १ वर्षासाठी ही निवड असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group