निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर मधुकरराव नीळ बहु. उद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबिराचा लाभ १०० लोकांना झाला आहे. आधार संस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा नलावडे, डॉ. संकेत भोसले, कॅम्प प्रमुख प्रशांत जगताप, कॅम्प ऑपरेटर आयुष यादव, मॉस कासमी, आदी अधिकारी उपस्थित होते..या प्रसंगी श्री आप्पा शिंदे यांना श्री.मकाई सह साखर कारखान्याचे संचालक सतीश बापू नीळ, यांचे हस्ते चष्मा देण्यात आला.यावेळी माजी पोलीस पाटील दिनकर पाटील,आबा भोसले, दत्ता साळुंखे, हनुमंत शिंगण, जनार्दन भोसले,व गावांतील इतर नागरिक उपस्थित होते.