भोसे गावच्या माजी सरपंच सौ. वनमाला भोजराज सुरवसे यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी भोसे गावच्या माजी सरपंच सौ. वनमाला भोजराज सुरवसे (वय ५५) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज (ता.२०) सायंकाळी ७:३० वाजता भोसे येथे होणार आहे.त्यांच्या मागे पती, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वनमाला सुरवसे या भोसे गावाच्या माजी सरपंच होत्या. माजी सरपंच भोजराज सुरवसे यांच्या त्या पत्नी होत्या तर पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या त्या सासूबाई होत्या. वनमाला सुरवसे यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.