करमाळा

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन मुस्लिम समाज करमाळातर्फे सत्कार

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर – माढा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज तर्फे सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना महेश जी चिवटे यांनी सांगितले की मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे मदतीने गरीब गरजू आजारी पेशंट यांना सर्व प्रकारच्या आजार गटांना मदत केली आहे व यापुढेही वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही अडचण असेल तर त्यांनी निःसंकोचपणे माझ्याशी संपर्क साधावा श़भर टक्के त्यांची अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. करमाळा शहराच्या व तालुक्यातील विकासासाठी अपुर्ण राहिलेले काम त्यातील अडचणी दूर करुन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे व काही कामे पूर्ण सुद्धा केली आहे. यापुढे आपले ध्येय करमाळा तालुक्यातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एम आय डी सी लवकरात लवकर कार्यान्वित कशी होईल व नवीन क़पन्या – उद्योग धंदे करमाळ्यात आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे . करमाळा शहरातील भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन ने अनेक सामाजिक कार्यातून सहभाग घेऊन हिंदू – मुस्लिम समाजातील एकोपा टिकवण्यासाठी व मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेहमी प्रयत्न करते असे कौतुकाची थाप दिली आहे व या सामाजिक संस्थेस सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. वाढदिवसानिमित्त सत्कार केल्या बद्दल भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाजाचे आभार मानले. यावेळी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख ( साहेब ) दैनिक लोकमतचे जेष्ठ पत्रकार नासीर कबीर, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुख भाई जमादार, संस्थेचे सचिव पिंटु शेठ बेग, रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सुरज शेख, युवक नेते मुस्तकीम भाई पठाण, शादाब खान व मुस्लिम समाजातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.कार्यक्रमाच्या शेवटी आभार पिंटु शेठ बेग यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group