मा.राज्यमंत्री लोकनेते स्व दिगंबरराव मामा बागल यांच्या जयंती निमित्त आयोजित कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण; कृषी महोत्सवाला होणार सुरूवात- मुख्य निमंत्रक रश्मी बागल यांनी केली पाहणी
करमाळा प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री, लोकनेते स्व दिगंबररावजी बागल मामा यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर दिनांक 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या कृषी प्रदर्शनासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टॉल आणि मंडपाची पाहणी राज्य साखर संघाच्या संचालिका व या कृषी प्रदर्शनाच्या मुख्य निमंत्रक रश्मी दिदी बागल यांनी आज केली.
यावेळी त्यांच्यासोबत मार्केट कमिटीचे उपसभापती चिंतामणी जगताप, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल, नगरसेवक सचिन घोलप, विजयकुमार लावंड, शिवसेनेचे बाळासाहेब कटारिया, सरपंच स्वप्निल गोडगे संदिप शेळके शुअर शाॅटचे इव्हेटचे गिड्डेसाहेबाचे सहकारी कोळेकरसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
