Uncategorizedकरमाळा

करमाळा नगरपालिका निवडणूक तिरंगी होणार व्यक्ती केंद्रित निवडणूक होणार असल्याने जगताप गट बागल गट सावंत गट देवी गट संजयमामा शिंदे गट भाजप समविचारी घटक पक्षांना अस्तित्व राखण्यासाठी मोठी सत्वपरीक्षा

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या जगताप बागल गटाबरोबर सावंत घटाने या निवडणुकीमध्ये करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपले आव्हान उभे केले आहे. करमाळा तालुक्याचे राजकारण पक्षापेक्षा गटातटावर चालत असल्याची चित्र आतापर्यंत आपणास पाहायला मिळाले आहे. सध्या बागल गट हा भाजपमध्ये असून दिग्विजय बागल सुद्धा शिवसेनेचे काम करत आहे जगताप गट शिवसेनेत आहे अशा परिस्थितीत असतानाही दोघांमध्ये टोकाचा संघर्ष आहे ‌ त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत महायुती म्हणून ‌ बागल गट देवी गट शिंदे गट त्याचे स्थानिक भाजपा गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महायुतीकडून ‌ म्हणजेच बागल गट देवी गट संजय मामा शिंदे व स्थानिक भाजपा यांच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी ‌ विलासराव घुमरे सर यांच्या ‌ पत्नी सौ जय श्री विलासराव घुमरे अथवा सून कोमल आशुतोष घुमरे यांच्या नावाची चर्चा असून नागरी संघटनेचे नेते देवी गट व संजय मामा भाजप यांच्यावतीने कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या उपस्थितीमध्ये कन्हैया लाल देवी  यांच्या निवासस्थानी बागल देवी चिवटे प्रा. झोळ सर एकत्र आले होते त्यामुळे महायुतीचा धर्म पाळून  यांच्यासह भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे  साथ मोलाची ठरणार आहे.  तीस वर्षापासून जगताप गटाची सत्ता नगरपालिकेवर आहे यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह  जिल्हा प्रमुख महेश चिवटे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची साथ त्यांना लाभली आहे .अशा परिस्थितीमध्ये जगताप गटाविरुद्ध सर्व विरोधक एकत्र होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे
माजी आमदार जयवंतराव जगताप हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असून शिंदे सेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार असल्याचे ‌ त्यांनी जाहीर केले असून त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून नगराध्यक्ष पदासाठी जगताप गटाकडून माजी आमदार जयवंतराव यांच्या पत्नी सौ नंदिनी जगताप , जगताप गटाचे श्रेणिक शेठ खाटेर यांच्या पत्नी माजी नगरसेविका संगीता खाटेर यांच्या नावाची चर्चा आहे तर सावंत गटाकडून सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी सौ मोहिनी सावंत नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार आहेत त्यामुळे करमाळा नगरपालिकेचे निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. पारंपारिक जगताप गट यांना शह देण्यासाठी बागल गटांने महायुतीच्या माध्यमातून भाजप देवी गट संजयमामा शिंदे गट भाजप कार्यकर्ते यांची मोळी बांधली आहे . बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांची भूमिका या निवडणुकीत निर्णयाक ठरणार आहे. तर सावंत गटानै ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढवण्या साठी कार्यकर्त्याच्या सोयीनुसार ‌ भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या चिन्हाचा उपयोग या निवडणुकीत करण्याची शक्यता आहे. एकंदर ही निवडणूक ‌ तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत परंतु साम-दाम दंड भेद यामध्ये सरस ठरणाऱ्या निवडणून येणारी पात्रता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यासाठी गटाचा प्रयत्न असणार आहे. करमाळा शहरातील रस्ते पाणी याबरोबर स्वच्छता छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा टाऊन हॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स महावीर उद्यान नगरपालिकेची इमारत हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार असून माजी नगरसेवकालाही केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा लागणार आहे. येणारे निवडणुक खऱ्या अर्थाने नेत्यांच्या अस्तित्वाची तर गटातटाची प्रतिनिधित्व करणाऱ्या भावी नगर सेवकांच्या सत्व परीक्षेची ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये‌ जनता जनार्दनाचा विश्वास संपादन करून नक्की कोण बाजी मारतो याचा निकाल 3 डिसेंबरला आपणास कळणारच आहे परंतु तिरंगी लढत अटळ असून ‌ जनतेची मते आपल्या पारड्यात घेऊन जगतापगट शिंदे सेनेच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये सत्ता राखण्यात यशस्वी होतो सर्व विरोधकांची बांधून बागल गट या निवडणुकीत फिफ्टी फिफ्टी च्या फॉर्मुल्याने यश मिळवतो हे ‌ आपणास बघायला मिळणार आहे. दोन्ही गटाला ‌ आव्हान देणारा सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या पसंतीला उतरून सत्ता मिळवतो हे येणारा निकालच आपणाला सांगणार आहे. एकंदर ही निवडणूक चुरशीची होणार असून सत्ताधारी विरोधक एकत्र येऊन कारभार केल्यामुळे जनता ही आपला विचार करून आपल्या आवडत्या काम केलेल्या  उमेदवाराची निवड करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक गटातटापेक्षा व्यक्ति केंद्रित झालेली दिसून येत आहे. तिरंगी लढतीमध्ये जो गट बाजी मारेल तोच या करमाळा शहराचा सत्ताधारी मालक होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!